महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील लोकमान्य विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५.०४ टक्के लागला असून विद्यालयाने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार केला आहे.विद्यालयाच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सहसचिव नामदेवराव कोल्हे, सदस्य गोपालराव ठेंगणे, अविनाश पाम्पट्टीवार, संजय पारधे, प्राचार्या आशालता सोनटक्के, उपप्राचार्य सचिन सरपटवार, पर्यवेक्षक रुपचंद धारणे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातून प्रथम आलेली जान्हवी काळे, द्वितीय आलेली प्रतीक्षा सातभाई, तृतीय आलेली नंदिनी वांढरे तसेच मराठी माध्यमातून प्रथम आलेली तनू भरडे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शहरातील सर्वच शाळांमधील पहिल्या दोन गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. त्यात आयुध निर्माणी हायस्कूलचे संजना गुरचल व चेतन कडाम, जि. प. हायस्कूलच्या खुशी चातुरकर व सानिया मेश्राम, यशवंतराव शिंदे विद्यालयाच्या सानिया कांबळे व साक्षी ठावरी, साई काॅन्व्हेंटच्या नंदिनी बडकेलवार व उन्नती सातपुते, सेंट ॲनेस स्कूलच्या सांची गणविर व गौरी बतकी, फेअरी लॅंड स्कूलच्या नेहा ढोके व वैभवी सुरजुसे, आंबेडकर कान्व्हेंटच्या प्राप्ती देवगडे व लीना उराडे, विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या नियती कोवे व योगेश्वरी खंडाळकर, कर्मवीर विद्यालयाच्या मासुम शेख व मानसी पोले यांचा समावेश आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या आशालता सोनटक्के यांनी केले. संचालन शिक्षक विकास मोहिते यांनी केले. पर्यवेक्षक रुपचंद धारणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक, पालक विद्यार्थी उपस्थित होते.