अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : 20 जून रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वाखाली पातूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल वाघमारे, युवा नेते कृष्णा बोंबटकार, फिरोज खान, सैय्यद इरफान, राहील ईकबाल,सुधाकर शिंदे, सागर हरणे, अतुल भांगे, दत्ता पांडे, पवन मोकळकार, विशाल चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचा निषेध केला.