अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
पातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज दि.17 जूनला दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखत शंभर टक्के निकाल लावला आहे. विद्यालयातील एकूण 57 विद्यार्थ्यांपैकी 57 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये विशेष प्रावीण्यासह 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 18 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये गोपाल संतोष तळोकार याने 93.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर गौरव भास्कर काळे याने 91.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रथम व द्वितीय क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेच्या अध्यक्ष सपना ताई म्हैसने,सचिव सचिन ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य जे डी कंकाळ, शिक्षक पंजाब ननीर, दिनेश करोडदे, सचिन पाचबोले, डी.जे राठोड, शाळेचे कर्मचारी राजू बावणे,हर्षल ढोणे यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे व त्यांच्या पालकांचे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मिळालेल्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक व आई-वडील यांना दिले.


