किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : महाराष्ट्रासह संपुर्ण देशामध्ये आराजकतेचा माहोल तयार झालेला आहे.भाजपच्या प्रवक्त्याने हुजूर मोहम्मद पैगंबर साहेबांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे देशाची एकता व अखंडता बाधित झाली असून सामाजिक वातावरण दूषित झाले आहे.हुजूर मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विषयी अनुचित वक्तव्य मांडणाऱ्या विरोधात कायदेशीर कार्यवाही व्हावी याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अँड.प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच पैगंबर बिल महाराष्ट्राच्या विधी मंडळात सादर केलेले आहे.त्या बिलाची आवश्यकता आज देशामध्ये मोठया प्रमाणात निर्माण झाली आहे.जर कोणी कुठल्याही धर्माबाबत आक्षेपार्ह विधान करत असेल अथवा सोशल मीडियावर पोस्ट करत असेल र त्यावर कलम 66 नुसार कारवाई होते व ही कारवाई थातुरमातुर स्वरूपाची असते,परंतु अशा विधानांमुळे देशात अराजकता निर्माण होऊन मोठ्या धोक्याची परिस्थिती तयार होऊ शकते म्हणून अशा समाजविघातक तत्वांवर कठोर कारवाई व्हावी याकरिता वंचित बहुजन आघाडीने मोहम्मद पैगंबर बिल विधी मंडळात दाखल केलेले आहे.त्याच्या समर्थनार्थ तसेच भाजप प्रवक्त्याने केलेल्या अनुचित विधानाच्या निषेधार्थ दि.17 जून रोजी मुंबई येथे ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा मार्च काढण्यात येणार असून स्वतःला कायम सेक्युलर म्हणूवून घेणाऱ्या पक्षांनी कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता या मार्चमध्ये सहभागी होऊन समर्थन करावे असे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता प्रा.धैर्यवर्धन पुंडकर यांनी केले. काल अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या दालनात शिवसेनेचे बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख व त्यांच्या समर्थकांनी जो गोंधळ घातला त्याबद्दल प्रतिक्रिया देताना पुढे असे म्हणाले की, मुळात हा सर्व प्रकार दिशाभूल करणारा असून वशिष्ठ पूर्ण योजने अंतर्गत शासनाने 17 नोव्हेंबर 2017 च्या अनुषंगाने अध्यादेश काढलेला असून त्यानुसार हा निधी नगर परिषद शहरी भागात तरतूद केलेला आहे.तसेच शासनाने सदर अध्यादेशात या निधीचा वापर बंधारे बांधण्यासाठी, पथदिवे, सौन्दर्यीकरण, भूसंपादनाचा मोबदला, संरक्षण भिंत इत्यादि कामे करण्यासाठी करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे,असे असतानाही सदर कामांवर जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून पातूर शहरातील शिर्ला ग्रामपंचायत हद्दीत जवळपास दीड कोटी रुपयांचा निधी टाकण्यात आला असून हा निधी विशेषतः नगर परिषदेच्या हद्दीमध्येच खर्च करावा अशी तरतूद असतांना केवळ दादागिरीने अनुज्ञेय नसलेल्या कामांवर नगर परिषदेच्या हक्काचा निधी ग्रामीण भागामध्ये वापरण्याकरिता जिल्हाधिकारी यांचेवर दबाव टाकत असून सदरचा प्रकार अनुचित आहे.पातूरकरांचा हक्काचा निधी इथल्या लोकप्रतिनिधी मार्फत ग्रामीण भागात पळविल्या जात असतांनासुद्धा वंचित बहुजन आघाडी व्यतिरिक्त पातूर शहरातील इतर पक्षीय नेत्यांपैकी एकानेही साधा निषेध व्यक्त करत विरोध दर्शविला नाही,बहुदा हे नेते स्थानिक आमदाराला घाबरून षंढ झाले तर नाही ना ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.सदर निधी हा नगर परिषदेच्या हक्काचा निधी असून याचा गैरवापर होऊ देणार नसून यासाठी रस्त्यावर उतरण्याची वा प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्याची देखील वंचीत बहुजन आघाडीची तयारी आहे.तसेच इतर पक्षीय नेत्यांनी सेना आमादाराच्या दबावाखाली न येता पातूर नगर परिषदेच्या हक्काचा निधी वाचविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. यावेळी पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता प्रा.धैर्यवर्धन पुंडकर, तालुकाध्यक्ष निर्भय पोहरे,हिरासिग राठोड ,जि.प सदस्य विनोद देशमुख,.जि.प.सदस्य सुनील फाटकर,पं.स.उपसभापती अर्चना डाबेराव,पं.स.सदस्य इमरान खान ,डॉ.ओमप्रकाश धर्माळ, ता.प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सुरवाडे,राजू बोरकर,अनिल राठोड,अर्जुन टप्पे,दिनेश गवई,नबु शाह आदी उपस्थित होते.