किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : तालुक्यात आत्महत्यांचे सत्र थांबता थांबेनात.मागील काही महिन्यांपासून शहरासह तालुकभरात लागोपाठ आत्महत्यांच्या घटनेची शाई वाळते न वाळत तोच काल रात्रीच्या सुमारास एका शेतातील विहिरीत इसमाने उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. काल दि.16 जून 2022 रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान पातूर – अकोला मार्गालगत असलेल्या सुरेश पाटील यांच्या शेतातील विहिरीत एका इसमाने नाट्यमय रित्या आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सदर इसम हा बाळापूर पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागात नोकरीस असून काल सायंकाळी हा इसम सदरचा शेतात आला असता आजूबाजूला उपस्थित शेतकऱ्यांनी त्यास कशाला आल्याची विचारणा केली असता त्याने आत्महत्या करण्यासाठी आलो आहे असे सांगताच शेतकऱ्यांनी त्याची समजूत काढून शेताबाहेर पाठवले.दरम्यान काही वेळाने शेतकऱ्यांची नजर चुकवून तो परत आला व विहिरीत उडी घेतली.सदर प्रकार उपस्थितांच्या लक्षात येताच त्यांनी विहिरीत पाहिले असता हा इसम मोटरपंप च्या दोरीला पकडून असल्याचे दिसल्याने त्यांनी विहिरीत दोरी फेकून त्यास पकडण्यास विनवणी करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला,पण सदर इसम ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हता व त्याने दोर सोडून दिला व पाण्यात बुडुन त्याचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती पातूर पोलिसांना मिळताच घटस्थळावर पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला असता रात्रीचा अंधार व विहीर 80 फूट खोल असल्याने मृतदेह काढणे शक्य झाले नाही. दरम्यान आज दि. 17 जून रोजी सकाळी 9:00 वाजताच्या दरम्यान पातूर पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ.दिलीप इंगळे, विलास पाटील,मोहन भारस्कर, संबोधी इंगळे,पो.कॉ.मयूर उमाळे,सत्यजित ठाकूर,पो.ना.रमाकांत केकन,विनोद कुंभारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.यावेळी रामदास श्रीनाथ, दुले खान युसूफ खान,देवीदास श्रीनाथ, संतोष वानखडे,अमन गवई,राणा डाबेराव,सुधाकर शिंदे,रणजित गाडेकर,अमित खुळे, प्रवीण डाखोरे,प्रवीण खुळे, गोपाल करवते यांनी मृतदेह बाहेर काढून एक किमी पर्यंत रोडवर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पातूर तालुक्यातील नवेगाव येथील प्रमोद धोंडूजी खुळे असे आत्महत्याग्रस्त इसमाचे नाव असून बाळापूर पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागात नोकरीस असून सदरचे वडील पातूर पंचायत समितीचे माजी सभापती असून घरी शेती आहे व सदरची पत्नी देखील नोकरीत आहे तसेच पारिवारिक वातावरण देखील चांगले आहे.तरीदेखील ह्या इसमावर आत्महत्या करण्याचा प्रसंग का आला असेल हे गूढ रहस्य आहे.


