अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
पातुर : तुळसाबाई कावल विद्यालय पातुर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, अंतर्गत मार्च/ एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथील एकूण 179 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी 179 विद्यार्थी पास झाले. तुळसाबाई कावल विद्यालयाचा निकाल. 99.44% तुळसाबाई कावल विद्यालय मधून तसेच पातुर तालुक्यामधून प्रथम क्रमांक प्रथम मैथिली जीवालाल जाधव 96. 60% 500/478 द्वितीय गौरी उल्हास घुगे 96.00 500/475 तृतीय शरयू राजू उगले 95.60 500/471 प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये डॉक्टर बनून देशाची सेवा करायची आहे.विद्यालयातून एकूण विद्यार्थी प्राविण्य श्रेणी विद्यार्थी : 141 प्रथम श्रेणी विद्यार्थी: 32 विद्यार्थ्याचे कौतुक प्राचार्य अंशुमनसिंह गहिलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण, उपमुख्याध्यापक आर एस ढेंगे, पर्यवेक्षक एम बी परमाळे यांनी केले. विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा विजयसिंह गहिलोत, व्यवस्थापक बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर , स्नेहाप्रभादेवी गहिलोत सचिव, अजितसिंह गहिलोत, जगमोहनसिंह गहिलोत, अशोकसिंह गहिलोत यांनी दिले.विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले.


