किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून सुजल सुगंधी या विद्यार्थ्याने विज्ञान विषयात शंभर पैकी शंभर मार्क मिळवून तालुक्यातून बाजी मारली आहे. तर नलिनी गाडगे या विद्यार्थिनीने 94.60% गुण मिळवून इंग्रजी माध्यमातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. दहावीच्या परीक्षेत
सुजल सुगंधी 94.20%,
यश वैराळे 93. 20%,
प्रसाद दैय्या 92.80%,
नेहा राऊत 92.40%,
गौरव बंड 92.20%,
दर्शन तायडे 92.00%,
गायत्री पेंढारकर 91.60%,
वैष्णवी पेंढारकर 90.20%,
मनप्रीत कौर 89.20%,
प्रज्वल शिंदे 88.20%,
रुद्र हिरळकर 84.60%,
सय्यद यासिर 83.80%,
मोहंमद मुसाब 79.80%,
आदी विद्यार्थ्यांनी गुण मिळवीत यश संपादन केले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांनी सत्कार केला. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक नरेंद्र बोरकर, चंद्रमणी धाडसे, जयेंद्र बोरकर, वंदना पोहरे, किरण दांडगे आदींचा सुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला.