किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
तहसीलदार मार्फत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले
पातूर : मागील दोनवर्षापासून कोरोना संकट असल्यामुळे राज्यातील सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाली होती. कोरोनाचे थैमान मागील काळात कमी झाले होते पण काही विद्यापीठाचे शिक्षण पण ऑनलाईन झाले. सध्या काही विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होणार असून कोरोनाची भीती पण निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी शासनाने वरील दोन्ही बाबींचा विचार करून या वर्षीही सर्व परीक्षा ऑनलाईन किंवा MCQ पद्धतीने घ्यावी असे निवेदन विद्यार्थी नेता मो फरहान अमीन यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. निवेदन देतांना फरहान अमीन यांनी असे म्हटले आहे की ज्या प्रकारे ऑनलाईन शिक्षण आणि ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली मग ऑनलाईन क्लास आणि परीक्षा ऑफलाईन का? यामुळे विध्यार्थ्या मध्ये असमंजसची परिस्तिथी निर्माण झाली आहे. यावेळी मो फरहान अमीन, मोहम्मद जैद,शहेबाज खान, शेख उबेद आदि विद्यार्थी उपस्थित होते.


