जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातूर
लातूर : आयुष मंत्रालय, भारत सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी, क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ ते २० जून २०२२ या कालावधीमध्ये दररोज स.६ ते ७.३० या वेळेमध्ये महाविद्यालयाच्या एम.सी.व्ही.सी सभागृहामध्ये सात दिवसीय योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज या शिबिराचे उद्घाटन योगाचार्य ॲड.विजयकुमार सलगरे आणि कु.प्रणिता सलगरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. हे शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर सिद्राम डोंगरगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. यावेळी आय.क्यू.ए.सीचे समन्वयक कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.नल्ला भास्कर रेड्डी, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.संजय गवई, डॉ.टी.घन:श्याम, बाबासाहेब क्षिरसागर, प्रा.आशिष क्षिरसागर, डॉ.गुणवंत बिरादार, प्रा.धोंडीबा भुरे, प्रा.एस.आर.हावळे, ए.जी.वाघमारे, विनायक लोमटे, अनिल उस्तुरगे, महादेव कोरे, केदार इटगे, अक्षय आठवले यांच्यासह कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. हे शिबिर २० जून पर्यंत चालणार असून त्याचा समारोप आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी होणार आहे आज योग आणि प्राणायामाचे विविध ॲड.विजयकुमार सलगरे आणि कु.प्रणिता सलगरे यांनी प्रात्यक्षिकासह करून दाखविले. यामध्ये भस्त्रिका, मयूरासन, वज्रासन, पद्मासन, अनुलोम-विलोम आणि मकरासन आदी विविध प्रकाराची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले यांनी केले तर आभार डॉ.रत्नाकर बेडगे यांनी मानले.