अभिजीत फंडाट
ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
मोरगाव भाकरे : पावसाळा सुरू होण्यापूर्वी गावातील नाल्याची साफ सफाई करण्यात यावी अशे गावकर्यांनी खूप वेळा सांगून ही सरपंच व सचिव या कडे दूर लक्ष्य करीत आहेत. नाल्या न काडल्या मुळे डासाचा प्रादुर्भाव खूप वाढत आहे. या मुळे गावकर्याच् आरोग्य ला धोका निर्माण होत आहे. साथीचे रोग व डेंगू, मलेरिया अश्या अनेक रोगाचा सामना गावकर्यांना करावा लागत आहे. गावातील पाणी पुरवठा असो वा नाली सफाई असो सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नाकडे नेहमीच पाठ फिरवली आहे. नाली माती व कचर्याने तुंब भरलेले आहेत. पण ग्रामपंचायत प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. लोकांचा घरात पाणी शिरल्यानंतर ग्रामपंचायतला जाग येणार की काय अशी चर्चा गावातील नागरिक करत आहेत.


