अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
पातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे चा निकाल नुकताच जाहीर झाला असून पातुर येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय पातूरची विद्यार्थिनी कु.आचल सुमेध गवई हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यालयातून तृतीय क्रमांक मिळवला आहे.आचल ही अत्यंत गरीब मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबातील असून आई वडिलांचे स्वप्न उराशी बाळगून व आपल्या भविष्याचा वेध घेत तिने रात्रंदिवस अभ्यास करून बारावीच्या विज्ञान शाखेतून परीक्षा दिली व विद्यालयातून तृतीय क्रमांक मिळाला. कोरोना काळात शाळा महाविद्यालय बंद असल्या मुळे योग्य वेळेस स्वयंअध्ययन यावर भर देऊन तिने यश संपादन केले. तिच्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक यांना देते.