विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : शिक्षण नीती आंदोलन समन्वय समिती. अकोला च्या वतीने रविवार दिनांक 12 जुन 2022 ला सकाळी 11 वाजता राज्यव्यापी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या विषयावर जनतेशी संवाद कार्यशाळेचे आयोजन उस्माना आझाद उर्दू हायस्कूल व के .एम . आसगर हुसण शिक्षण महाविद्यालय रतनलाल प्लॉट अकोला येथे आयोजित केली असून या कार्यशाळेला शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, शिक्षक मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष तसेच शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समाजसेवक गजानन हरणे यांनी केले आहे. या कार्यशाळेचे उदघाटन शिक्षक आमदार माननीय किरण सरनाईक यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्याम मुंडे अध्यक्ष सत्यशोधक शिक्षण सभा महाराष्ट्र, स्वागताअध्यक्ष माजी मंत्री खान मोहम्मद अजहर हुसेन, प्रमुख उपस्थिती विजय कौशाल, प्रशांत गावंडे, संयोजक सुरज मेश्राम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती जाणून घेण्याकरिता जागृक नागरिक, महिला युवक-युवतींनी या कार्यशाळेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनांदोलन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.


