अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : दि – 11 जून श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे आषाढी एकादशीसाठी निघालेली श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे शनिवारी सायंकाळी आगमण झाले.भाविकांनी माऊलीच्या पालखीचे शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले.शेगाव येथून निघालेल्या पायदळ दिंडीचा पातूर येथे मुक्काम होता. ठिकठिकाणी दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. चौकाचौकात श्री.संत गजानन महाराज यांची मूर्ती ठेवून भाविकांनी पाखलीत सहभागी वारकऱ्यांसाठी विविध साहित्याचे वाटप केले.जागोजागी फुलांच्या माळा, रांगोळ्या, फटाक्याची आतिषबाजी, स्वागत कमानी, फलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आले होते. उत्साहपूर्ण वातावरणात वारकरी व भाविकांनी श्रींच्या पालखीचे स्वागत केले. दुपारी ४ वाजता वंदनाताई ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या मैदानावर पालखी सोहळा विसावा घेऊन मेन रोड मार्गे प्रस्थान केले. संभाजी चौक, मिलिंद नगर,जुने बसस्थानक पातूर पोलीस स्टेशन परिसर ते पातूर पंचायत समिती येथे भाविकांना पालखीचे दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. वारकऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोना साथीमुळे दोन वर्षाच्या निर्बंधामुळे पालखी सोहळ्याला मर्यादा होती. यावर्षी कोणत्याही निर्बंधाशिवाय श्री गजानन महाराज पालखीचे पातूर नानासाहेब नगरीत आगमन झाले. वारकरी व भाविकांमध्ये उत्साह संचारला होता. ही पायदळ वारी भजनी दिंडी, अश्वासह सुमारे ७०० वारकरी ध्वज घेवून सहभागी झाले आहेत.यावेळी पातुर पोलीस स्टेशन चे कर्तवदक्ष ठाणेदार मा. हरिष गवळी व उपनिरीक्षक मा. हर्षल रत्नपारखी,वनपरीक्षेत्र अधिकारी धिरज मदने तसेच पोलीस कर्मचारी यांनी श्रींच्या पालखीचे विशेष पूजा-अर्चना करून श्रींचे दर्शन घेतले.पालखी प्रमुख वारकरी यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी व युवक आघाडी यांनी सहकार्याचे योगदान देऊन पालखीचे स्वागत करण्यात आले.


