महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील तुफान डान्स अकादमी तर्फे आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचा नुकताच समारोप करण्यात आला.अकादमीचे कोरिओग्राफर आश्विन खोब्रागडे व डायरेक्टर विजय श्रीवास यांच्या नेतृत्वात दि.२१ मे ते ११ जूनपर्यंत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर येथील फेअरी लॅंड स्कुलच्या आवारात यशस्वी रित्या पार पडले. यात फेयरीलॅंड स्कुलच्या संचालक वर्षा धानोरकर व युवराज धानोरकर यांचा मोठा सहयोग होता. शिबिरामध्ये ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात विद्यार्थ्याना नृत्य, संगीत, कराटे, आर्ट ॲन्ड क्राफ्ट, स्केटिंग, योग शिक्षण, शिष्टाचार व विविध प्रकारचे प्रशिक्षण या शिबिरात विद्यार्थ्याना देण्यात आले. यात शिक्षक म्हणून आश्विन खोब्रागडे ( नृत्य ) , नैतिक बिंजवे ( गेम्स ) , पवन राजभर ( कराटे ) , मृणाल बोरसरे ( आर्ट एंड क्राफ्ट ) , प्रकाश आस्वले, सुनील वैद्य, रविन्द्र भोयर ( योग व शिष्टाचार ), राजेश येरणे ( स्केटिंग ), दानिश शेख ( संगीत ), समीक्षा अडोले ( नृत्य ) व इतर पालकांनी आपले सहयोग दिले.