सोनेराव गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी लातूर
लातूर : झाडे आपल्याला ऑक्सिजन, सावली, फळे,फुले देतात.त्यामुळे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे.संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती या अभंगाचा दाखला देत औसा तालुक्यातील तपसेचिंचोली येथील पत्रकार प्रशांत नेटके यांनी त्यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला. ऑक्सिजनची गरज व झाडांचे महत्व लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार प्रशांत नेटके यांच्या वतीने तपसेचिंचोली येथील खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी सरपंच मारुती नेटके ,चंद्रकांत गुरव ,खंडू नेटके,सतीश पाटील,किसन बनसोडे, प्रमोद नेटके,रितेश सरवदे,व्यंकट सुरवसे, गणेश नेटके ,महादू कांबळे,हणमंत नेटके ,मारुती शिंदे ,दिलीप नेटके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. वृक्षारोपण काळाची गरज -प्रशांत नेटके समाजाने हे लक्षात घेणे गरजेचे असून प्रत्येकाने वृक्षाची लागवड करावी. वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यापुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील.