अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर – शिर्ला : संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त संपूर्ण बौद्ध धम्माचे प्रेरणास्थान असलेले बुद्ध भूमी शिर्ला येथे भव्य शरबत वाटप करण्यात आला ह्यावेळी 3 ते 4 हजार बौद्ध उपासक उपासिकांना शरबत वाटून बौद्ध पौर्णिमा साजरी केली. ह्या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे,रि.पा.ई.(आ) पातूर शहर अध्यक्ष प्रमोद डोंगरे ह्यांनी केले होते.तरी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिष गुडधे,सुरेंद्र अवचार,पवन तांबे,वैभव अवचार,गजानन पोहरे,रुपेश अवचार,अमर हिवराळे,शुभम हिवराळे,आदींनी अथक परिश्रम घेतले ह्यावेळी असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.