अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
बुधागड जि.अमरावती दि १६ मे २०२२ स्थानिक न्यु पंचशिल तरूण उत्साही मंडळ व मातोश्री सावित्रीबाई फुले महीला मंडळ, जेतवन बुद्ध विहार परिसर, बुधागड, ता. भातकुली, जि. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बुद्ध जयंती महोत्सव २०२२’ तथागत बुध्द आणि संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमांचे अनावरण आणि सागर जवंजाळ यांची लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत पोलीस उपनिरिक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल यांचा नागरी सत्कार या त्रीवेणी कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हनुन बोलतांना प्रसिध्द आंबेडकरी वितारवतं तथा संचालक सार्थक वक्तृत्व अकॅडमी,अकोला चे संचालक विशाल नंदागवळी यांनी वरील प्रतीपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. श्रीकांत बनसोड होते तर प्रमुख पाहुणे आयु.राहुल आठवले पोलीस निरिक्षक अमरावती हे होते.प्रमुख उपस्थिती म्हनुन प्रा. राहुल माहुरे, प्रा.ॲड. आकाश हराळ, अमीत लोंढे सामाजिक कार्यकर्ता सोमेश्वर भाऊ गावडे, सामाजिक कार्यकर्ता अमित वानखडे, दिपकराव चंदर विचारपीठावर उपस्थीत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की,तथागत गौतम अतिशय बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण असं व्यक्तीमत्व आहे.त्यांच्या विचारात देशाला महासत्ता बनविण्याचे सामर्थ्य आहे.त्यांच्यासारखा शिक्षक यापूर्वी कधीही होऊन गेला नाही. भारताची जगभरातली खरी ओळख आजही ‘बुद्धांचा देश’ हीच आहे. तथागतांचा धम्म हा विज्ञानवादी आहे. स्वत: बुध्दीच्या कसोटीवर एखादी गोष्ट तपासुन पाहा पटलं तर स्विकारा अन्यथा सोडुन द्या. इतका लवचीक आणि हजारो वर्षापासुन चालत आलेल्या अंधश्रद्धा,अनिष्ट रुढी, परंपरा यांची चौकट तोडुन चाकोरी मुक्त करणारा धम्म बुध्दांनी सांगितला. जगात दुःख आहे हे बुध्द मान्य करतात.आणि दुःखावर मात करण्याचं बळ देखील देतात. असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्हि.टी पारडे यांनी तर आभारपर्दर्शन जनार्दन डोंगरे यांनी केले.यावेळी कार्यक्रमासाठी गावातील नागरीक आणि महिला उपासिका संघ म्हैसपूर, मधलापूर, नवथळ, वाठोडा शु.,नावेड, सोनारखेडा, भातसी, हरताळा, खोलापूर, गणोजा, धामोरी, खारतळेगांव उपस्थीत होते.











