अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर- दि.१६ मे, २०२२ श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित डॅा. एच.एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातूर येथे आय क्यु ए सी विभाग आणि करीअर ॲंड गाईडन्स प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक १९ मे, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले आहे.प्रसिध्द मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि जम्बो मार्ट कंपनी लिमिटेड या कंपन्यांचे अधिकारी महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन योग्य विद्यार्थ्यांची निवड करतील.
सेल्स एक्झीकेटीव्ह आणि टेलीफोन उद् घोषक या पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांना अकोला येथे कार्य करावयाचे आहे.या पदांकरिता किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास असणे आवश्यक आहे. मुलं आणि मुली दोघेही मुलाखत देवु शकतात.ITI आणि MS-CIT उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.पातुर तालुक्यातील सर्व गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करतांना प्रभारी प्राचार्य म्हणाले की, आपल्या ग्रामीण भागामध्ये येऊन रोजगार देण्याचे जे कार्य ह्या दोन मोठ्या नामांकीत कंपन्या करत आहे ते अत्यंत अभिनंदनीय आहे.
आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी जाणे ही आपल्या परिसरासाठी आणि आपल्या महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे अशाच प्रकारच्या अनेक रोजगाराच्या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही उपलब्ध करुन देवु असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ किरण खंडारे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांनी सोबत येतांना महाविद्यालयाचा गणवेष आणि ओळखपत्र सोबत आवश्यक सर्व आधारकार्ड, बायोडाटा, गुणपत्रीका इ. कागदपत्रे सोबत आणावी.तरी या सुवर्ण संधीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ किरण खंडारे, प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा अतुल विखे, आय क्यु ए सी समन्वयक डॉ संजय खांदेल आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.