शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि
3 लाख रुपयांच्या जवळपास शेतकऱ्याचे नुकसान
अकोट- अकोट तालुक्यापासून जवळ असलेल्या देवरी फाटा येथे गोठ्याला भीषण आग लागली आग इतकी भयंकर होती ती त्यामध्ये बांधलेल्या 3 गाईंना सोडण्याचा सुद्धा वेळ मिळाला नाही प्राप्त माहिती अनुसार अकोट पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेले देवरी गावाबाहेर पांडुरंग श्रीपद वडणे यांचे शेत आहे, शेतामध्ये त्यांनी गुराढोरांसाठी तसेच शेतीचे साहित्य ठेवण्यासाठी गोठा बांधला होता आज दुपारी बाजाराच्या सुमारास अचानक गोट्याला आग लागली या आगीत 3 गाई किंमत 1 लाख पन्नास हजार रुपये तसेच कडब्याची कुटार अंदाजे किंमत 75 हजार रुपये शेतीचे साहित्य किंमत अंदाजे 50 हजार रुपये जवळपास 3 लाख रुपयांच्या जवळपास शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे, आगि विषयी अकोट नगर परिषद अग्निशामक विभागाला माहिती दिली असता त्यांनी अग्निशामक विभागाच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे सांगितले त्यानंतर तेल्हारा नगरपरिषद अग्निशामक विभागाने तात्काळ दखल घेत देवरी गाव गाठून गोठ्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले दुपारी दोन वाजेपर्यंत कुठलेही अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते अकोट नगर परिषद जर गाडी वेळेवर पोचली असती तर शेतकऱ्याचे नुकसान झाले नसते अशी चर्चा देवरी गावात होत आहे.











