हिन्दू – मुस्लिम बांधवांनी एकमेकांशी गळाभेट घेऊन दिला माणूसकीचा परिचय
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : शहरात ईदगाह येथे मुस्लिम बांधवातर्फे मोठया प्रमाणात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे दोन वर्षांनंतर मोकळेपणाने ईद साजरी झाली आहे.जगभरातील मुस्लिम लोक ईद-उल-फित्र साजरा करतात, जो सर्वात महत्वाचा सण आहे.मात्र राज्यासह देशातील कोरोना निर्बंध हटल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात देशभरात ईद साजरी झाली आहे. मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यात ईदचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी मुस्लिम बांधवांना एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली.हा रमजानच्या शेवटी साजरा केला जातो. यामध्ये गरिबांना अन्न देणे आणि भिक्षा वाटणे. ईद-उल-फित्र साजरी करून, उपवास आणि प्रार्थना कालावधी संपतो. चंद्र पाहिल्यानंतर लोक नवीन कपडे घालतात आणि आपल्या प्रियजनांना भेटतात.गेल्या महीनाभर मुस्लिम बांधवांनी सतत कडक उन्हात उपवास ठेवले.सर्व हिन्दू मुस्लिम बांधवासाठी एकता अखंडता प्रेम संपूर्ण देशात सुखशांतीसाठी अल्लाहकड़े प्रार्थना केली.यामध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पातूर विद्यार्थी आघाडीचे अर्जुनसिंह गहिलोत, अविनाश पोहरे, तुषार शेवलकार, पवन तांबे, राहुल वाघमारे, अविनाश गवई, पवन सुरवाडे सहित इतर संघटनानी सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने माणूसकीचा परिचय देऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पातूर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा.हरीश गवळी, उपनिरीक्षक मा. हर्षल रत्नपारखी यांनी कडक चोक बंदोबस्त ठेऊन आपल्या कर्मचाऱ्यांसोबत सर्व मुस्लिम बांधवाना पुष्पगुच्छ देऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.पातूरात हिन्दू मुस्लिम बांधवांनी एकामेकांशी गळाभेट घेऊन एकता, बंधुता व अखंडता याचा संदेश मिळवून दिला. ईद-उल-फित्र ईद मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.











