अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले ह्यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पातूर व रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद च्या वतीने पातूर शहरातील ईदगाह मस्जिद येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने भोंगे काढण्याच्या भूमिकेचा विरोध करण्यात आला व त्याकरिता आज रमजान ईद निमित्त संरक्षण देण्यात आले.व त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवाना पुष्प गुच्छ देऊन रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या व सर्व धर्म समभाव असून कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये असे आवाहन करण्यात आले. ह्यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हासंघटक आकाश गुलाब हिवराळे, पातूर तालुका अध्यक्ष सागर इंगळे,शहर अध्यक्ष प्रमोद डोंगरे,ग्रा.पं. सदस्य शिर्ला मंगल डोंगरे,अण्णा पोहरे,हरिष गुडधे, सुमेध पोहरे,निखिल उपर्वट, पंकज पोहरे,सुरेंद्र अवचार,पवन तांबे,वैभव अवचार,रुपेश अवचार,राधे धाडसे,श्याम कराळे, निखिल सहस्त्रबुद्धे, ऋषिकेश पुरुषोत्तम, सतीश सुरवाडे,स्वप्नील सहस्त्रबुद्धे, मंगल सरदार,सुरेंद्र हिवराळे, अभिजित किरतकार,सनी पोहरे,अमोल कांबळे,आशिष किरतकार,योगेश पोहरे, हर्षल शेलारकार,सागर शेगोकार,नागेश बावणे,संतोष सुरवाडे,देवमन डोंगरे,अमर धाडसे,आनंद सुरवाडे,मोहम्मद इमरान, अय्याज खान,मंगेश धाडसे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने संरक्षण करण्यासाठी उपस्थित होते.