किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : ग्राम उगवा – येथील ग्रामविकास ज्येष्ठ नगरिक सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलना नंतर बाळाभाऊ केने व संच यांनी पाहुण्यांचे साग्रसंगीत स्वागत गीताने स्वागत केले.ग्रामविकास ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष के.जी .देशमुख अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम )अतिरिक्त मुख्य सचिव अभि. विनायकराव पांडे विदर्भ पश्चिम प्रादेशिक विभागाचे सचिव डॉ. सुहास काटे, जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष नारायण अंधारे, डॉ. माहेश्वरी, रामेश्वर सपकाळ, अँड पी बी साकरकर, डॉ. चव्हाण, मंगलाताई देशमुख,डॉ. विजयाताई दांदळे ,मेघाताई पटेल, मेश्राम गुरुजी, हे होते. प्रथम दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अभि. विनायकराव पांडे यांनी ज्येष्ठ नागरिक चळवळीचा इतिहास कथन केला तर डॉ. सुहास काटे यांनी महिला संघाची आवश्यकता व्यक्त करून ग्रामविकास महिला सेवा संघाची स्थापना करण्यात आली.ग्राम विकास महिला सेवा संघ असे नामकरण करून अध्यक्षपदी डॉ. मेघाताई पटेल ,उपाध्यक्षपदी विजयाताई दांदळे, तर सचिवपदी प्रमिलाताई आमले आणि कोषाध्यक्षपदी दुर्गाताई कावरे यांची निवड करण्यात आली. जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष नारायण अंधारे यांनी संघ तेथे विरंगुळा केंद्र व्हावे असे आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी डॉ. माहेश्वरी, डॉ. चव्हाण, रामेश्वर सपकाळ, अॅड पी. बी.साकरकर रमणलाल पटेल ,रामहरी अघडते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विजय बाहाकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता धोंडोपंत ठाकरे रामदास तराळे, विजय बाहाकर, रामदास सिरसाठ, रामहरी अघडते, किसनराव गहिले, हेमंत पटेल, नाजुकराव देशमुख, रमण पटेल, महादेवराव कापसे विलासराव देशमुख, पुंडलीक सिरसाठ, रवी देशमुख,दादा देशमुख, उमेश पटेल, यांनी प्रयत्न केले. रामदास सिरसाठ यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. पसायदानाने वर्धापन दिन सोहळ्याची सांगता झाली.