विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला : जिल्ह्याच्या वतीने ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटना च्या वतीने
दि.१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त अकोला जिल्हा बार्शीटाकळी तालुक्यातील निरंजन महाराज संस्थान मोरगाव काकड येथे संपन्न झाला. या मेळाव्यासाठी अकोला , बार्शिटाकळी, अकोट, बाळापुर, पातुर, तेल्हारा, मुर्तीजापुर , या तालुक्यातील सर्व पत्रकार बंधु मेळाव्याला उपस्थित होते.
निरंजन महाराज संस्थान चे भजन मंडळाने स्वागत गीत गाऊन आणि महापुरुषांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे राठी, जिल्हा परिषद बांधकाम सभापती डोंगर दिवे हे होते.
पत्रकार हा आपल्या देशाचा चौथा आधारस्तंभ आहे परंतु कोणत्याच पत्रकाराला शासनाकडून कोणतीच मदत म्हणून मिळत नाही त्याचे प्रयत्न आम्ही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोचवण्याचं काम आणि पत्रकाराला त्यांना सुख सुविधा देण्याचा पोचवण्याचं काम आमच्याकडून करण्यात येईल असे आश्वासन बांधकाम सभापती डोंगरदिवे यांनी भाषणातून सांगितले.
त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटने विषयी माहिती दिली संघटना कशी मदत करायची आणि शासन दरबारी आपल्या मागण्या कशा पूर्ण करायच्या या उद्देशाने जिल्हा अध्यक्ष आठवले, निलेश पोटे, गणोरकर, कुलट, यांनी आपल्या भाषणातून समजावून सांगितले.
ज्या पत्रकारांनी संघटनेची कर्तुत्ववान कामगिरी केल्याबद्दल
त्यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. प्रास्ताविक गायके सर यांनी केले तर आभार प्रदर्शन काकड यांनी केले.











