शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधि अकोट
अकोट : ग्राम दिवठा णा येथे गुरुकुंज येथून चरण पादुका घेऊन आलेल्या प्रचार यात्रेचे स्वागत करण्यात येऊन ग्राम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . जिल्हा सेवधारी रवींद्र मुंडगावकर. केंद्रीय सेवाधारी भानुदास कराळे.अकोट तालुका सेवाधारी विश्वासराव वालशींगे.यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरण पादुकांचे पूजन व गुरूकुंज वरून आलेल्या मंडळीचे स्वागत केले. गावा मधून शोभा यात्रा व रामधून काढण्यात आली .त्या नंतर हनुमान मंदिरामध्ये शेवकानी भजन सादर केले .रवींद्र मुंडगावकर व भानुदास कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार यात्रेचे प्रमुख सुशील महाराज वणवे यांचे प्रबोधन झाले. जिल्हा प्रचार प्रमुख डॉ.अशोक रत्नपारखी यांनी ही प्रबोधन केले यावेळी मान्यवरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार सांगून अमूल्य मार्गदर्शन केले. व राष्ट्रवंदणे नंतर महा प्रसादाचा कार्यक्रम झाला.प्रास्तविक विश्वासराव वाल शिंगे अकोट तालुका शेवाधिकरी तर आभार प्रदर्शन अकोट प्रचार प्रमुख सचिन भुस्कट सूत्रसंचलन राहुल शेंडे यांनी केले.कार्यक्रमाला भीमराव गावंडे,काशिराम लोखंडे,पांडुरंग इंगळे,अस्वार गुरुजी,विजय पांडे,राजेश खापरकर,उकलकर साहेब,आठवले,विष्णू निमकर्डे,महादेवराव चव्हाण,गजानन कोल्हे,रामदास बोर्डे,दिनेश बीचे,गजानन रोडे, डॉ. माने,विजय ढोक,गजानन वालसिंगे,पांडुरंग वालशिंगे,गणेश शेंडे,संतोष मोहोड,अमित शेंडे,भीमराव वालसिंगे,आदी उपस्थित होते