विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : सर्वत्र महाराष्ट्रात भोंग्या च्या वादावरून राजकारणी लोकांनी समाजामध्ये कलह निर्माण झाल्यामुळे समाजा, समाजा मध्ये कलह निर्माण होऊ नये आपल्या गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व सर्व धर्मीयांचे सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करण्यात यावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अकोला तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन येथे दि.28 एप्रिल रोजी 5 ते 6 वाजेपर्यंत रमजान ईद , अक्षय तृतीया, बौद्ध पौर्णिमा या उत्सवाच्या निमित्ताने सर्वधर्म समभाव संमेलन अंतर्गत शांतता समिती सभासद, मशिदीचे अध्यक्ष, मौलवी तसेच धार्मिक स्थळे व पुतळा संरक्षण समितीचे सभासद 50 ते 60 लोकांचे उपस्थित कार्यक्रम घेण्यात आला. पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजय कुमार वाढवे, आणि हिंदू मुस्लिम व बौद्ध धर्माचे धर्मगुरु यांनी मार्गदर्शन केले.

तसेच आगामी सण उत्सवाच्या काळात आपापल्या गावात सद्भावना व जातीय सलोखा राखण्याबाबत मार्गदर्शन करून त्यांना आपापले धार्मिक स्थळांची व पुतळ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे हे सांगून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक , पोलीस पाटील , सरपंच, पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते. प्रस्ताविक पिंटू पाटील यांनी केले तर आभार पोलीस पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू वानखेडे यांनी केले.











