शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि अकोट
अकोट : तालुक्यातील कासोद बफर झोन मधील शेतशीवारातील ७० वर्षे जुन्या15ते20 झाडाची विनापरवानगी अवैद्ध वृक्षातोड केल्याने पर्यावरणाची हानी झाली आहे.अशा रानकसाईवर कार्यवाही ची वृक्षप्रेमीची मागणी जोर धरत आहे.कासोद शिवारात झालेल्या अवैद्ध वृक्षतोडीचे संबंधित शेतकऱ्यांनी या प्रकरणाची लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. बोर्डी येथील शेतकरी शहाबुद्दीन शेख शरीफोद्दीन शेख यांचे कासोद शेत शिवार गट नं. ३०१ मध्ये ३.१७ हेक्टर आर जमीन आहे. या जमिनीच्या बांधावरील निंबाचे, पळसाचे व मोहाचे 15ते20अशा हीरव्यागार झाडांची दि.२० एप्रिल २०२२ रोजी साबीर अली शादत अली यांनी अवैध वृक्षतोड केली यावरुन शेतकरी शहाबुद्दीनशेख यांनी अवैद्य वृक्षतोडीची तक्रार दिली असता वनपरिक्षेत्र नरनाळा चे वनपरिक्षेत्र अधिकारी पठाण यांनी अवैद्य वृक्षतोडीचा पंचनामा करून कत्तल केलेल्या झाडांची लाकडे जप्त केली आहेत. अवैध वृक्षतोड करणार्यावर कडक कार्यवाहीची मागणी संबंधीत शेतकरी करत आहे.
माझ्या कासोद शिवारातील ३०१ गट नंबर मधील धुऱ्यावरच्या हिरव्यागार झाडांची साबीर अली शादत अली यांनी विनापरवानगी कत्तल केली.मी या अवैध वृक्षतोडीची तक्रारे केली असुन चौकशी करुन कारवाई मांगनी केली आहे . – शहाबुद्दीन शेख शरीफोद्दीन शेख शेतकरी कासोद शीवार