अक्षय राऊत प्रथम क्रमांकाचे मानकरी
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आयोजित युवा महोत्सव २०२१ ब्रजलाल बियाणी महाविद्यालय,अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता. सलग चार दिवस संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कलाकार विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या युवा महोत्सवात वेगवेगळ्या कला प्रकारात सहभाग घेतला होता. त्यामध्येच वादविवाद या कला प्रकारामध्ये अक्षय राऊत यांनी श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला चे प्रतिनिधित्व करत प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाला बहुमान मिळवून दिला. तसेच हा बहुमान फक्त महाविद्यालयालाच नाही तर या पूर्वी अकोल्याच्या इतिहासात अकोल्याला मिळालेला नव्हता हा इतिहास पुसत युवा महोत्सव २०२१ चा वादविवाद स्पर्धेचा मान अकोल्याला पहिल्यांदाच मिळवून दिला. या यशासाठी सगळीकडेच अक्षय राऊत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. युवा महोत्सव २०२१ च्या बक्षीस वितरणासाठी शालेय शिक्षण मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आ. बच्चूभाऊ कडू , मुख्य आकर्षण मराठी बिग-बॉस २ फेम शिव ठाकरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सं.गा.बा.अ.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे, ब्रजलाल बियाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धोटे, प्रमुख अतिथी आमदार सुलभा खोडके, कुलसचिव डॉ.तुषार देशमुख संचालक विद्यार्थी विकास विभाग प्रा.डॉ.राजीव बोरकर, युवा महोत्सव नियोजन समिती अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल गवई, डॉ. कमलताई बोंडे, डॉ.जयश्री वैष्णव, डॉ.रेखा मंग्गीरवर, डॉ निखिलेश नलोडे, डॉ.दिनेश सातंगे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले तर प्रास्ताविक डॉ राजीव बोरकर यांनी केले, डॉ.किरण सांगवे यांनी आभार मानले.
- युवकांच्या कला-कौशल्य आणि सामर्थ्याला व्यासपीठ उपलब्ध करून देशाचं भविष्य घडविणाऱ्या युवांचा हा युवा महोत्सव आहे. श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाविद्यालयाने माझ्यावर विश्वास दाखवून संधी दिली म्हणून या यशाचे श्रेय मी महाविद्यालयाला देऊ इच्छितो.
विजेता- अक्षय भाऊराव राऊत