महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश महामंत्री शिवानी दाणी यांचे उद्या दि.२७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता कोंढा फाटा आणि भद्रावती शहरातील स्व.बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारासमोर आगमन होत असून त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजयुमोचे जिल्हा महामंत्री इम्रान खान यांनी केले आहे.मा. शिवानी दाणी चंद्रपूर जिल्ह्यात संगटनात्मक दौऱ्या वर येत असून माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार हंसराज अहिर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळेयांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वातभारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स च्या शाखा फलकाचे अनावरण शिवानी दाणी यांच्या हस्ते होणार आहे.तरी या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चाच्या तसेच सर्व आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.