रकमा तात्काळ जमा न झाल्यास करण्यात येईल शिवसेना स्टाईल आंदोलन
- अजय ढोणे
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम करण्यात आले आहेत बांधकाम करण्यात आलेल्या घरकुलाचे गेल्या अनेक महिन्यापासून हप्ते मिळाले नसल्याने घरकुल धारक त्रस्त झाले असून लाभार्थ्यांनी उधार पैसे घेऊन जवळपास बांधकाम पूर्ण केले आहेत असे असताना त्यांना अद्याप रकम मिळाले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे त्यामुळे येत्या दहा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुलांच्या रकमा जमा करण्यात यावे अन्यथा येत्या पंधरा तारखेला पातूर नगर परिषद कार्यालयात शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पातुर शिवसेनेचे शहर प्रमुख अजय ढोणे यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन त्यांनी 27 एप्रिल रोजी दुपारी बाळापुर मतदारसंघाचे आमदार नितीन बापू देशमुख यांचे मार्गदर्शनात मुख्याधिकारी नगरपरिषद यांना दिले आहे या निवेदन देणाऱ्या मध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख अजय ढोणे, उपशहर प्रमुख निरंजन बंड, उपशहर प्रमुख शंकर देशमुख, प्रमोद गाडगे, राजेश खंडारे ,
विठ्ठल आयसकर, नलिनी उगले, संजय अत्तरकार, अनिल गाडगे, विजय गायकवाड, गजानन पाटील, रामदास राखोंडे, अर्जुन पाटील, सचिन गिर्हे, अक्षय खराटे, संजय गायकवाड, दिनेश गिर्हे, धीरज परिहार, आनंदा तायडे, मंगेश बोरकर आदी सह घरकुल धारक आणि इतर शिवसैनिकांचा यावेळी समावेश होता











