गुराढोरांना व शेतकऱ्यानं होणार लाभ
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये अकोला जिल्ह्यात तापमानाचा जागतिक विक्रम स्थापित झाला आहे अकोला जिल्हा हा तापमान मध्ये जगात 3 क्रमांक वर नोंद झाली आहे या मुळे पातूर तालुक्यात पाणी पातळी मध्ये कमालीची घट निर्माण झाली होती तसेच नदी काठी असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या शेती साठी विहिरी ची पाणी पातळी खाली गेल्याने पाणी टंचाई चा सामना करावा लागत होता तसेच पातूर शहरातील घरगुती विहिरी यांची पाणी पातळी हि खालावली होती या कडक उन्हाळ्यामध्ये गुरे ढोरे तसेच जंगली श्वापदे यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता या सर्व बाबी चा विचार करता माजी केंद्रीय राज्य मंत्री खासदार संजूभाऊ धोत्रे यांनी दि 13/4/2022 रोजी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला याना पत्र देऊन पातूर तलावमधील अतिरिक्त जलसाठा हा बोर्डी/सुवर्णा नदी मध्ये सोडण्याचे आदेश दिले होते त्या पत्राच्या अनुषणगाने दि 24 रोजी पातूर पाटबंधारे विभाग यांनी पातूर तलावाचे पाणी हे बोर्डी नदी मध्ये सोडले ते पाणी आज रोजी बोर्डी नदी मधून पातूर शहराची सीमारेषा पार करून वाहत आहे तलाव मधून सोडलेल्या पाण्यामुळे चिंचखेड,बोडखा,येथिल नदी लगत असणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होऊन त्याना उन्हाळी पीक घेण्यास सोयीस्कर जाऊन शेतातील विहिरींची जल पातळी वाढली आहे तसेच चिंच खेड बोडखा परिसरातील घरगुती विहिरी ची सुद्धा पाणी पातळी वाढून या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे तसेच पातूर तलाव परिसर व बोर्डी नदी ज्या भागातून पातूर शहरालगत वाहत येते तो बहुतांश भाग हा जंगलाचा येत असल्याने जँगली श्वापदे तसेच शेतकऱ्यांच्या गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला
पातूर शहरात पण या कडक उन्हाळ्यामुळे घरगुती विहिरींची पाणीपातळी खालावली होती तसेच पातूर शहरालगत असणाऱ्या जमीन हि बागायती पट्टा येत असल्याने अश्या शेतकऱ्यांना सुद्धा शेतातील विहिरींची पाणी पातळी खालावल्यामुळे चिंता वाटत असताना पातूर तलावमधील सोडलेल्या पाण्यामुळे या पिकांना नवसंजीवनी नक्की मिळेल तसेच पातूर शहरातील विहिरींची जल पातळी सुद्धा वाढेल मागच्या वर्षी सुद्धा खासदार संजय धोत्रे यांनी पाटबंधारे विभागाला पत्र देऊन पाणी सोडण्यास सांगितले होते दरवर्षी संजय धोत्रे यांचे पाणी टंचाई व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पातूर तालुक्यावर विशेष लक्ष असते या मध्यमातूनच अश्या जनसामान्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी पत्र व्यवहार करून खासदार संजू धोत्रे हे जनसामान्यांचे प्रश्न निकाली काढत असतात
पातूर तलावातील पाणी बोर्डी नदी मध्ये सोडल्याने शेतकरी तसेच सामान्य नागरिक सुखवल्याचे चित्र दिसत आहे तसेच काही शेतकऱ्यांनी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये न चुकता आठवणीने पातूर तलाव मधील पाणी सोडण्याचे आदेश देणाऱ्या खासदार संजय धोत्रे यांचे कौतुक तसेच आभार मानले आहेत