किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
ज्येष्ठ कवी नारायण अंधारे अध्यक्ष अकोला जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती. यांचे ‘गुण गातो आवडीने’या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अंकुराच्या अमरावती येथील 59 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्व हिंमतराव शेकोकर साहित्यनगरीत मान्यवर साहित्यिकांचे शुभ हस्ते कवी आणि रसिकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले. स्व अरविंद भोंडे विचारपीठावर ज्येष्ठ साहित्यिक संमेलनाध्यक्ष मा. शेषराव खाडे,दीप प्रतिष्ठान अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष पंडितराव पंडागळे,युवा कादंबरीकार तथा महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, कार्यवाह डॉ प्रमोद काकडे, अंकुर केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष हिंमत ढाळे (हास्यकवी) सचिव प्रा. संजय कावरे, कार्याध्यक्ष तुळशीराम बोबडे, प्रा. डॉ साधनाताई निकम जळगाव, प्रा.राम जाधव धुळे, डॉ. पापालाल पवार धुळे, किशोर देशमुख परभणी, राजा धर्माधिकारी, राजाभाऊ देशमुख, प्रशांत भोंडे देवानंद गहिले अध्यक्ष पातुर तालुका पत्रकार संघ श्री कृष्णराव घाडगे ना.मा. मोहोड अकोला अनंत अंधारे मुक्ता प्रकाशनचे सागर लोडम पि.टी गावंडे अध्यक्ष जेष्ठ नागरिक समन्वय समिती अमरावती आणि निमंत्रित कवींची उपस्थिती होती प्रकाशन सोहळ्यानंतर निमंत्रित कवींनी आपल्या काव्य रचना सादर करून सोहळ्याची सांगता झाली