विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला : तालुक्यातील पातुर नंदापूर येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन. नंतर एसटी कामगारांचा संप त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी सेवा कोळंबली होती. लांब पल्ल्याच्या एसटी बस चालू असल्याकारणाने ग्रामीण भागामध्ये प्रवाशांची खूप गैरसोय झाली. परंतु आता कोरोना काळापासून दीर्घ विश्रांती मिळाल्या मुळे व एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्या मुळे
इतक्या दिवसापासून 26 एप्रिल ला ९.३० वाजता लाल परीचे पातुर नंदापूर नगरीत आगमन झाले. दोन वर्षाच्या काळापासून लालपरी गावा मध्ये आल्यामुळे अध्यक्ष सौ दीपमाला मिलिंद खाडे यांनी एसटीचे पूजन करून आणि चालक वाहक यांचे स्वागत केले. गावात लाल परी आल्यामुळे गावकरी आनंद व्यक्त करीत होते. त्याप्रसंगी दिनकरराव आव्हाळे, मिलिंद खाडे, उमेश इंगळे. खंडोबा सवडे खंडू बासोडे, पत्रकार विकास ठाकरे, आणि गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.