किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : येथील वैकुंठधाम येथे सेवा देणाऱ्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला अमोल गाडगे यांनी गाय -वासरूचे दान दिले.पातूर येथील नागरिकांना अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना विविध सुविधा व सेवा देण्याच्या उद्देशाने अभ्युदय फाउंडेशन ही सेवाभावी संस्था सेवा देत आहे. याठिकाणी नागरिकांना सेवा देण्यासाठी संस्थेने पगारी कर्मचारी नियुक्त केला आहे. अभ्युदय फाउंडेशनच्या कार्याला मदत व्हावी या हेतूने पातूर येथील प्रगतीशील कास्तकार अमोल शंकरराव गाडगे यांनी गाय वासरू दान देत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला या गाय -वासरूच्या संगोपणाची जवाबदारी दिली आहे. यावेळी अमोल गाडगे, राजू आवटे,अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत, प्रविण निलखन,डॉ. संजयसिंह परिहार, दिलीप निमकंडे, प्रशांत बंड उपस्थित होते.