किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच मा. सुचिता पाटेकर (शिक्षणाधिकारी माध्य )यांच्या मार्गदर्शनात शालेय स्तरावर ,विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृद्धिंगत व्हावी म्हणून वाचन व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दोन गटांमध्ये संपन्न झाली असून अ गटातून प्रथम क्रमांकाची मानकरी कु. कोमल इंगळे ठरली तर द्वितीय क्रमांक कु.साक्षी वानखेड़े हिने पटकावला व तृतीय क्रमांक कु.श्रुति कांबळे हिने प्राप्त केला.तर ब गटातून प्रथम कु. सृष्टी आयस्कार हिने पटकावला तर कु.तनुजा शेगोकार हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला तसेंच तृतीय क्रमांकाचा मानकरी नैतिक डोंगरे ठरला केला .हस्ताक्षर स्पर्धेमधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य.एस .एम. सौंदळे व विद्यालयातील शिक्षकांनी पुस्तक व शालेय वस्तू भेट देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य. एस. एम सौंदळे तसेच पी.जे राठोड, ए.व्ही सोनटक्के , प्रा. जे.डी भारस्कर, प्रा.व्ही आर.थोरात, प्रा.आर.एम बचाटे, प्रा.एस.टी गाडगे, प्रा.एस. बी आठवले, सौ.आर. ए. जाधव, जी. एन राऊत सी.ए. वाघ, सौ.के.डी. लोखंडे,सौ.आर एस.देशमुख, एस. एच जाधव , एस बी.पोहरे, बी.डी राठोड, जे.के खुळे, पी.एस शेगोकार, डी.जे राजनकर, व्हि. डी राठोड ,श्रीमती बी.बी आडे आदीं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , व , विद्यालयातील विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.