महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे सार्वजनिक मिरवणुकी मध्ये विशेष योगदान
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर : गेल्या दोन-तीन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या घरात साजऱ्या केल्या यावर्षी निर्बंध हटविल्या आल्यामुळे यावर्षीची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली,भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न, महामानव, कायदे पंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती गुरुवार दिनांक 14 एप्रिल रोजी पातूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली, सकाळी बुद्ध विहार येथे पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पातूर शहरातील नागरिकांनी उत्साहात जयंती साजरी केली. जयंतीमित्ताने विविध ठिकाणी वही, पेन व पुस्तके वाटप करण्यात आले. संध्याकाळी 6 वाजता बुद्ध विहार येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मिरणूक काढण्यात आली. परिसरात भिमसैनिकांची मोठी गर्दी केली होती. सामूहिक पंचशील,त्रिशरण घेण्यात आले. लाईटचा झगमगाट,आकाशामध्ये फटाक्यांची आतिशबाजी आणि डीजे तालावर साजरी करण्यात आली. मोठ्या आनंदाने नाचण्याचा आनंद खूप वर्षांनी तरुणाईने घेतला. डॉ. बाबासाहेबांना यांना विविध ठिकाणी अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर जयंतीचा हा आनंद द्विगुणित झाला तो संध्याकाळी निघालेल्या तब्बल दोन वर्षांनी मुक्त झालेल्या कोरोना नन्तर प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. त्यानंन्तर सायंकाळी निघालेल्या मिरवणुकांमुळे मोठ्या आनंदाने साजरी करण्याची उत्सुकता होती. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत होते.शेवटी समारोप नन्तर सामूहिक बुद्धवंदना, पंचशील त्रिशरण घेण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पोलीस पाल्यांना पोलीस भरतीमध्ये 5 टक्के आरक्षण देणारी एकमेव संघटना आहे. पोलिसांच्या कुटुंबासाठी व त्यांच्या न्याय,हक्कसाठी झटणारी एकमेव संघटना आहे. संस्थापक अध्यक्ष मा. रविभाऊ वैद्य हे असून यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष मा. निलेश किरतकार यांच्या अंतर्गत पातूर शहरामध्ये येणाऱ्या सर्व सन – उत्सवात मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्यांना होणारा अतिरिक्त ताण कमी व्हावा याकरिता पोलीस बॉईज असोसिएशन यांच्या कडून होणाऱ्या मिरवणुकीमध्ये वेळोवेळी पोलीस प्रशासनासोबत काम करण्यास नेहमी तत्पर राहणार आहे.मिरवणुकीमध्ये
पोलीस बॉईज असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी पातूर तालुक्यातील देऊळगाव, बाभुळगाव, भंडारज, चिखलगाव, कापशी,खानापूर,पार्डी,आगीखेड, बेलुरा, आस्टूल अश्या विविध ठिकाणी ग्रामीण भागात जाऊन सार्वजनिक मिरवणुकीमध्ये सहकार्य करून आपले योगदान दिले. यामध्ये पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अर्जुनसिंह गहिलोत, उपाध्यक्ष अविनाश पोहरे, सचिव कु. कोमल सुरवाडे, सरचिटणीस पवन तांबे, सहसचिव अविनाश गवई, सतिश कांबळे, प्रसिद्धी प्रमुख निखील उपर्वट,पंकज पोहरे,पवन सुरवाडे, हर्षल ठक,संदेश चव्हाण,सय्यद तौसिफ़,शेख समीर,सय्यद शहजाद, शेख इमरान यांनी मिरवणुकीत बंदोबस्तामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सहकार्य करून आपले योगदान दिले. संपूर्ण कार्यक्रम व सार्वजनिक मिरवणुकीमध्ये पातूर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा.श्री. हरिष गवळी व उपनिरीक्षक मा.श्री.हर्षल रत्नपारखी यांनी न्याय व सुव्यवस्था बाधित ठेऊन व नियमांचे काटेकोर पालन करून चोक व कडक बंदोबस्त ठेऊन सहकार्य केले व कार्यक्रम शांततेत संपन्न झाला.