राजबोधी बहुउद्देशीय संस्था व द प्रोफेशनल करिअर अकॅडमी यांचा अभिनव उपक्रम
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त गुरूशिष्य जयंती निमित्त राजबोधी बहुउद्देशीय संस्था व द प्रोफेशनल करिअर अकॅडमी पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले मैदान भिम नगर बाळापूर रोड पातूर येथे युवा व्याख्याते विशाल नंदागवळी यांचे जाहीर व्याख्यान तसेच फुले, शाहू, आंबेडकर यांचे जिवन चरित्र पुस्तके वाटपाचा कार्यक्रम दिनांक १३/०४/२०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पातूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार मा. श्री. हरिष गवळी साहेब, मा. श्री. सै. एहसानोद्दीन साहेब प्रभारी तहसीलदार बाळापूर, मा. श्री. राहुल खंडारे मुख्य प्रशासकीय अधिकारी वैद्यकीय महाविद्यालय पातूर, मा.श्री. राहुल उद्रे साहेब ग्राम विकास अधिकारी प.स. पातूर, मा. श्री. हिदायत खान रुमखान गटनेते न.प. पातूर, दिपक धाडसे संचालक कॄषि उत्पन्न बाजार समिती पातूर, सौ. आर्चना शिंदे सरपंच शिर्ला, सौ. रुपाली सुरवाडे न.प. सदस्यता पातूर, मंगल डोंगरे ग्रा.प. सदस्य शिर्ला, निर्भय पोहरे ग्रा.प. सदस्य शिर्ला, फिरोज खान ग्रा.प. सदस्य शिर्ला, सै. इरफान ग्रा.प. सदस्य शिर्ला, प्रा. शंकर गाडगे, प्रा.प्रदीप करवते, कृष्णा बोंबटकार, मो. शाकीर भाई, प्रविण पोहरे, सचिन सुरवाडे, हरिभाऊ सुरवाडे, शालिग्राम डोंगरे, प्रविण बोरकर, विजय उपर्वट, अविनाश पोहरे, आदी उपस्थित होते. यावेळी युवा व्याख्याते विशाल नंदागवळी यांनी उपस्थित सर्व नागरिकांना फुले, शाहू, आंबेडकर यांचे जिवन चरित्र व्याख्यानाच्या माध्यमातून सांगितले, तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करुन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखील उपर्वट यांनी केले तर आभार प्रदर्शन निर्भय पोहरे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे अध्यक्ष पंकज पोहरे, प्रविण सुरवाडे, पवन सुरवाडे, सुरज धाडसे, किरण सुरवाडे, हर्षल डोंगरे, अनिकेत उपर्वट, आदित्य बोरकर, अभिषेक सुरवाडे, अक्षय सुरवाडे, अभिषेक उपर्वट तसेच मंगलदादा डोंगरे मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेतले.











