किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : ग्राम शिर्ला (अंधारे) येथील श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघ व श्री सोमपुरी महाराज वाचनालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समतेच्या महाकाव्याने अभिवादन करण्यात आले. प्रथम खंडातील निवडक कवितांचे वाचन करण्यात आले. प्रकाश अंधारे यांची सम्यक संबोधी या काव्यरचनेला उपस्थितांकडून चांगलीच दाद मिळाली.
अंधार पेलला तू
अंगार झेलला तू
तोडीत शृंखला त्या
झुंजार चालला तू
सदर अभिवादन कार्यक्रमात नारायण अंधारे यांनी ‘बाबासाहेब तुमच्या जन्मामुळे’ आपली काव्यरचना सादर केली. यावेळी देविदास इंगळे, डिगांबर उगले, संतोष अंधारे, मीराताई राऊत, रेखाताई गवई यांनीही आपले मनोगतात बाबासाहेबांच्या जीवनाच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकला फेस्काॅमच्या विदर्भ पश्चिम विभागाने जागतिक महिलादिना निमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केलेल्या विजयी स्पर्धक आशाताई अ.अंधारे संगीता पातुरे, ह.भ.प. राजू महाराज कोकाटे यांना वीरमाता मंदाबाई निमकंडे आणि ग्रा.पं. सदस्य रेखाताई गवई यांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रमुख उपस्थितांमध्ये गुलाबराव कोकाटे, वीरपिता काशीराम नीमकंडे, वीरमाता मंदाबाई निमकंडे, आशाताई अंधारे, रेखाताई गवई, मीराताई राऊत, प्रतिभा वसतकार, सुहास कोकाटे, सुरेंद्र गाडगे, संतोष अंधारे, देविदास निमकंडे, श्रीकृष्ण रा. अंधारे भाष्कर विटकरे, अनंता अंधारे, सोयरा अंधारे, ईश्वरी राऊत, यांची उपस्थिती होती.