शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि
अकोट : आगामी रमजान महिना तसेच महात्मा फुले जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती हे उत्सव कोव्हीड -१९ बाबतचे निर्बंध दूर झालेनंतर शांततेत पार पाडण्याचे अनुषंगाने पोलिस स्टेशन अकोट ग्रामीणकडून पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम मोहाळा, अकोलखेड, अकोली जहांगीर येथे रूट मार्च घेण्यात आला. तसेच ग्राम अकोलखेड व अकोली जहांगीर येथे नागरिकांच्या कॉर्नर मिटिंग घेण्यात आल्यात व नागरिकांना आगामी सण उत्सव शांततेत व सामाजिक सलोखा ठेऊन साजरे करणेबाबत सूचना दिल्यात. तसेच आक्षेपार्ह व धार्मिक व सामाजिक सलोखा बिघडेल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकणारांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अश्या सूचना देण्यात आल्यात.
सदर रुटमार्च मध्ये अकोट ग्रामीणचे पोलीस अधिकारी, अंमलदार व गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.











