शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि
बोर्डी येथील ऋषिकेश संजय तांडे या बीएस्सी च्या विद्यार्थ्याने तरुणाई फाउंडेशन सोबत सामाजिक बांधिलकी म्हणून बुलढाण्यातील बालविकास गृहात, सुधारगृह,अनुरक्षण आणि निरीक्षण गृहातील मुलांसोबत वाढदीवस साजरा करून मुलाचे चेहऱ्यावर आनंद फुलवीला.
जन्मदिन म्हणजे भूतकाळातील केलेल्या कर्तृत्वाची वजाबाकी असते.परंतु बालगुन्हेगार यांचा भूतकाळ अंधारमय असल्याने त्यांच्या सुखी जीवनाचे स्वप्न दुःखी रुपये अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधारात दडलेला असल्याने जन्मदिन ते साजरा करू शकत नाही.
अशा ठिकाणी जन्मदिन साजरा करणारी व्यक्ती असामान्य असून त्यांच्या प्रेरणा व मार्गदर्शन देणारी व्यक्ती सुद्धा असामान्य असते. अशा ठिकाणी वाढदिवस साजरा करुण मिळालेला आनंद याचे समाधान वाटते.
महीला बालविभागामार्फत अनाथ मुलांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने, शासकीय मुलांचे निरिक्षण गृह, बालसुधारगृहात,मा. बाल न्यायालय मंडळ यांचे आदेशाने बालगुन्हेगार मुला-मुलींना संस्थेत दाखल करून माणुस घडवीण्याचे कार्य करण्यात येतात.
बुलढाणा येथील बालसुधारगृहात महेद्र आष्टीकर सर बालकांना शैक्षणिक,व्यावसायिक प्रशिक्षण देऊन माणूस घडवण्याचे काम करीत आहेत.
परंतु मुलांना जन्मदिन माहीत नसल्याने त्यांचा जन्मदिन साजरा होऊ शकत नाही याची जाणीव तरुणाई फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी ठेवून सामाजिक बांधिलकी जपत कृषिदूत ऋषीकेश संजय ताडे या विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून मित्र-मैत्रिणींनी बुलढाणा येथील बालसुधारगृहात आपला वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा केला.अशा प्रकारे इतर सामाजिक कार्यकर्ते,प्रतिष्ठित नागरिकांनी अशा ठिकाणी जन्मदिन साजरा करावा जेणेकरून अनाथ मुला मुलींनाही आनंदीत करता येते.
असे म्हणतात जिथे अर्थ असते तिथे स्वार्थ असते.
जीथे निस्वार्थी असते तिथे अर्थ असतो











