सिदाजी महाराज यात्रा महोत्सव
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : संत श्री सिदाजी महाराज यात्रा महोत्सव निमित्ताने स्वरसाधना संगीत विद्यालयाचे वतीने आयोजित भक्तीसंगीताच्या सुरांनी पातूरकरांना रिझवले.
स्थानिक संत श्री सिदाजी महाराज संस्थान व यात्रा पंच मंडळ व्दारा आयोजित यात्रा महोत्सव मोठया उत्साहात पार पडत आहे. या महोत्सवात रामनवमी च्या पर्वावर स्वरसधना संगीत विद्यालय यांच्या वतीने भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ गायक प्रा. विलास राऊत, नाना भडके, आनंद जहागीरदार, मदन खुणे, प्रा. गोपाल राऊत आदी कलावंतांनी सुरेल भक्तीगीते सादर करून वातावरण भक्तिमय केले. तसेच स्वराली राऊत, आणि आरोही राऊत या बाल गायिकानी रामचरीतमाणस मधील हम कथा सुनाते है… हे गीत सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. यावेळी हार्मोनियम प्रा. विलास राऊत,तबला मंगेश राऊत, ऑर्गन प्रविण राऊत, टाळ आकाश गाडगे आदी कलावंतांनी साथ संगत दिली. पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक प्रा. विलास राऊत यांनी केले. संचालन किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी केले. तर आभार संदीप देऊळगावकर यांनी मानले. या कार्यक्रमाला राजू बुडूकले, जेष्ठ पत्रकार प्रदीप काळपांडे, देवांनंद गहिले, राष्ट्रधर्म युवा मंच चे पातूर तालुका अध्यक्ष संदीप गिऱ्हे, प्रा. विठोबा गवई, करुणा गवई, आदी सह बहुसंख्य श्रोत्यांची उपस्थिती होती.