निलेश किरतकार
मुख्य संपादक, अकोला
पातूर : पातूर तालुक्यातील विवरा येथे सिद्धार्थ बुद्ध विहाराच्या भव्य प्रांगणात येणाऱ्या भीमजयंतीचे औचित्य साधून जय्यत तयारी सुरू आहे. लहान थोरांसह चिमुकल्या मुलांमध्ये जयंतीचा उत्साह दिसून येत आहे. येत्या 14 एप्रिल 2022 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी शासनाने कोरोना विषयक सर्व निर्बंध हटवले आहेत. आधीच दोन वर्षांपासून मिरवणूक आणि शोभयात्रांना मनाई होती. परंतु या वर्षी सर्व मिरवणुका आणि शोभायात्रांना कोणत्याही निर्बंधांशिवाय परवानगी शासनाने दिली आहे. म्हणून राज्यभरातील भीम अनुयायी भीमजयंती जल्लोषात साजरी करण्यासाठी तयारीला लागले आहेत. त्याच निमित्ताने अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा येथील बुद्ध विहार हे अकोला सर्वात मोठे बुद्ध विहार असून येथे समाज बांधवांनी एकत्र येऊन हिरवीगार बाग फुलवली आहे. या सर्व मनमोहक वातावरणात रोज सायंकाळी चिमुकले मुले भीमजयंती च्या मिरवणुकीसाठी लेझीम खेळण्याचा सराव करत आहेत. येथील आखाडा हा प्रसिद्ध असून प्रौढ माणसे सुद्धा आतापासूनच आखाडा , लाठी काठी खेळण्याचा सराव करताना दिसत आहे. यंदा भीमजयंती ची मिरवणूक असल्याने सर्वांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.