नागरिकांनी मोठ्या संख्येने आरोग्य तपासणी करून घ्यावे संतोष कांबळे यांचे आवाहन
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : अहेरी तालुका मुख्यालयापासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिमलगट्टा येथे 3 एप्रिल ला भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.या मध्ये आरोग्य तपासणी चाचणी,वैद्यकिय सल्ला,मोफत औषधोउपचार व आदी जोश फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट जिमलगट्टा च्या वतीने आयोजित करणार आहे.तरी या भव्य मोफत आरोग्य तपासणी साठी जिमलगट्टा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घ्यावे तसेच तरुणांनी पुढाकार घेऊन रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन दी जोश फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव संतोष कांबळे यांनी केली आहे.जिमलगट्टा हे गाव अहेरी मुख्यालयापासून 45 किलोमीटर अंतरावर असून अतिदुर्गम क्षेत्रात मोडते त्यामुळे या ठिकाणी पासून अहेरी मुख्यालयी किंवा रुग्णालयात येण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते.तसेच या क्षेत्रात आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात असून मुख्यालयी जाण्यासाठी वेळेवर साधन उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव भोंदूबाबांकडे जाऊन उपचार करून घ्यावे लागत आहे, तसेच आलापल्ली ते जिमलगट्टा मार्ग पूर्णपणे उखडल्याने नागरिकांना रहदारीस मोठी अडचण निर्माण होत असल्याने या सर्व त्रासाला कंटाळून जाऊन नागरिक भोंदूबाबा कडे जात असल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.या सर्व गोष्टी लक्षात घेऊन येथील दी जोश फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.संगीता मेडी व सचिव संतोष कांबळे यांनी आपल्या क्षेत्रातील नागरिकांना त्रास होता कामानये म्हणून 3 एप्रिल रोज रविवार ला भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात डॉ.यशवंत दुर्गे,डॉ.मेघा चव्हारे,डॉ. संगीता मेडी,डॉ. गणेश मडावी,डॉ. तिरुपती करमे असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य उपचार करून घ्यावे असे आवाहन कांबळे यांनी केली आहे.