किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
शिर्ला : गावची भूमी पावन आहे असे गोपाल महाराज उरळकर यांनी आपल्या पुण्यस्मरण कीर्तनात सांगितले.सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयातील गोविंदराव अंधारे आणि सुमित्राबाई अंधारे यांच्या स्मारकाचे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.त्यांनी येथील पावन भूमीचा गौरव करताना श्री सोमपुरी महाराज ,शहीद स्मारक, सत्संग भूमी, बुद्धभूमी ,तसेच ह-भ-प महादेव महाराज निमकंडे, ह भ प राजु महाराज कोकाटे, वीर पिता काशीराम निमकंडे, कृष्णा अंधारे आणि त्यांचे सर्व बंधूंचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ‘कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा’ या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा त्यांनी दाखला दिला. उपस्थितांनी त्यांचे भावपूर्ण किर्तनाचा लाभ घेतला. ग्रामस्थ मंडळी तसेच निमंत्रित पाहुण्यांनी सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाचा परिसर सुश्राव्य किर्तनाने भारावून गेला होता. अंधारे परिवाराने सर्व उपस्थितांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.प्राचार्य राम खर्डे आणि त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग दिला स्नेहभोजनाने सोहळ्याची सांगता झाली.











