सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त व अति दुर्गम भाग असलेले बिनागुडा या आदिवासी गावाला आरमोरी तालुक्यातील गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखराच्या पदाधिकाऱ्यांनी लाहेरी(भामरागड) पासून अठरा किलोमीटरचा खळतळ प्रवास पायी जाऊन भेट दिली व गावातील आदिवासी नागरीकांच्या समस्या ची माहिती जाणुन घेतली यात सविस्तर वृत्त असे की गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील शेवटच्या टोकांवर असलेल्या बिनागुडा हे गाव अतिदुर्गम भागील आदिवासी नागरीक कसे जिवन जगताहेत हे पाहण्यासाठी गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा चे अध्यक्ष दिलीप घोडाम व उपाध्यक्ष शेषराव कुमरे यांच्या नेतृत्वात संस्थेचे पदाधिकारी यांनी लाहेरी पासून अठरा किलोमीटर खळतळ रस्त्यांनी पायदड प्रवास करुण बिनागुडा गावाला 24 मार्चला भेट दिली व गावातील आदिवासी नागरीकाशी संवाद साधला असता येथील आदिवासी नागरीकानी सांगीतले की,बहुतेक लोकांना उज्वला गँस सिलेंडर मिळाले पण रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आर्थीक परस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावे लागत आहे.गावात विज नाही म्हणून शासनाने सौरऊर्जा लाईट दिले पण बहुतेक घरचे लाईट बिघडल्याने अंधारात जिवन जगावे लागत आहे. आरोग्याची बिकट समस्या असुन रूग्णाला तालुक्याच्या ठिकाणी नेण्याकरिता अठरा किलोमीटर खाटेवर नेण्याची वेळ येते.यात कित्येक लोकांचे नेताना जिवही गेले आहे.आतापर्यंत बिनागुंडा वासियांना कोणताही रोजगार उपलब्ध झाला नसल्यामुळे येथील कृटुब परसोड बाबुचे वाते,अळबी खेकडा,दामोळा ची भाजी तसेच जंगलातील ईतर जिवनावश्यक वस्तुवर उदरनिर्वाह करित आहे.परंतु शासनाच्या कोणत्याही योजनांचे लाभ मिळत नसल्यामुळे परीस्थिती बिकट झाली आहे असे बिनागुंडा नागरिकांनी सांगीतले असल्याने गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यानी दखल घेऊन गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे व राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी.पाढवी यांच्या कडे बिनागुडा येथील आदिवासी नागरीकांच्या समस्या सोडविण्यात यावे.अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष शेषराव कुमरे,सचिव गिरीधर नेवारे,सदस्य सुरेश मेश्राम,यादोराव कहालकर, लिपिक गुणवंत ज्यामुळे व सुनिल कुमरे उपस्थित होते.











