महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री तथा आमदार रामदास आंबटकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली:- भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक धानोरा रोड गडचिरोली येथील महाराजा सभागृहात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेञाचे संदिप कोरेत हे आपल्या संघटन कौशल्य व जिद्दीने भाजपा पक्ष संघटना वादी साठी प्रयत्न करत असल्याने त्यांना पक्षात आदिवासीं आघाडी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आले.कोरेत यांनी आपल्या निवडीचे श्रेय उपेंद्र कोठेकर,आमदार रामदास आंबटकर,खासदार अशोक नेते, किसन नागदेवे, प्रकाश गेडाम यांना दिले.या बैठकीत पक्षवाडी वर वरिष्ठांनी मार्गदर्शन केले.विदर्भाचे संघटन मंत्री उपेन्द्र कोठेकर,राज्य संघटन मंत्री व आमदार रामदास आंबटकर खासदार अशोक नेते,जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे,आमदार देवराव होळी,आमदार कृष्णा गजबे,प्रकाश सावकार पोरेडीवार,बाबुराव कोहळे, रवी ओलालवार,प्रमोद पिपरे,गोविंद सारडा,प्रशांत वाघरे,सदानंद कुथे, रमेश भुर्से,योगिता पिपरे,योगिता भांडेकर,रेखा डोळस,जिल्हा तालुका व सर्व आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











