शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधी
अकोट : आज दि २८.०३.२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता व बाह्य स्तोत्र कर्मचारी संघर्ष समितीचे विद्यामाने दोन दिवसीय संपाचे आयोजन संपुर्ण महाराष्ट्र भर करण्यात आले आहे याकरीता कृती समितीच्या वतीने महावितरण अकोट विभागीय कार्यालया समोर उग्र निर्दशने व आंदोलन करण्यात आले . सदरचे आंदोलन हे प्रमुख ६ मागण्या करीता असुन महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपनीचे होऊ घातलेले खासगीकरण थांबावणे , केन्द्र सरकार च्या विद्युत संशोधान बिल २०२१ ला विरोध करणे, महाराष्ट्रातील जलविद्युत केन्द्र खासगी उद्योजकास न देता सरकारकडे च ठेवणे, तिन्ही कंपन्यातील एकतर्फी बदली धोरण-२०२२ स विरोध करणे, चारही कंपन्यामध्ये कमी असलेले मनुष्यबळ भरतीच्या माध्यमातुन पुर्ण करावे व बदल्या मध्ये होत असलेला राजकीय हस्तक्षेप थांबविणे तसेच बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना कायमस्वरूपी नोकरी मध्ये समावने किंवा त्यांना वयाच्या ६० वर्षा पर्यंत नोकरीत सरंक्षण देण्यात यावे . सदर संपाला एसईए संघटनेचे श्री अजयकुमार वसु यांनी संबोधून केन्द्र सरकार कसे जनतेच्या कंपनीचे खासगी क्षेत्रात वर्ग केल्यास सर्वसामान्य व शेतकरी लोकांचे शोषण होईल या बाबतीत माहिती दिली स्वाभिमानी संघटनेचे श्री योगेश वाकोडे यांनी कामगार कायदे यांचे सुनियोजीत तुष्टीकरण कामगाराना मारक आहे याची माहिती दिली वर्कर्स फेडरेशन चे श्रीं राजसिंह गोठवाल यांनी जसे केन्द्र सरकारने कृषी कायदे मागे घेतला त्याचप्रमाणे विज कायद्यातील संशोधन मागे घेण्यात यावे अशी मागणी संपाद्वारे करण्यात येत आहे. लाईन स्टॉफ संघटनेचे श्री रुपेश तायडे यांनी खासगीकरण विरोध करण्याकरिता सर्व सामान्य लोकांना आपला संप का महत्वाचा आहे या बाबत मार्गदर्शन केले . आंदोलन स्थाळी भाजपचे मा. राजुभाऊ नागमते शिवसेना नेते श्री मनिषभाऊ कराळे प्रहार जनशक्ती पक्षाचे श्री निखील गावंडे मा सौ स्फुर्ती ताई निखिलराव सभापती महिला व बालकल्याण जि.प. अकोला , छावा संघटनेचे श्रीं निवृत्ती दादा वानखेडे प्रहार जनशक्ति पक्षाचे श्री सुशिलभाऊ पुंडकर यांनी भेट दिली व तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायती नी सुद्धा पांठिबा दर्शविला . श्री विजय गोरे श्री रजाअली श्री अमोल गुल्हाणे, श्री मनोहर देशपांडे श्री रोशन अढाऊ श्री योगेश सलामे श्री सचिन कुलट श्री एम आर खान श्री संजय डफडे श्री सचिन चिंचोळकार श्रीं मोहन हिरपुरकर श्री भाउदेवराव सोळके श्री गफूरभाई श्रीं नरेन्द्र देशमुख श्री सचिन टवले श्री मंगेश कवळे श्रीं प्रशांत सोनटक्के श्री मनिष डाबरे श्री शुभम नारे श्री अनिकेत माने श्रीं मंगेश कावरे श्री अनिकेत वानखडे श्री चेतन गणगणे श्रीं स्वपनील सुदरकर श्री नितीन घोम श्री अजय गजबे श्री मंगेश जायले श्रीं राजेश राऊत श्रीं अक्षय उकळकार श्री अमोल नागमते श्री रमेश झामरे श्रीं आकाश बघेले श्रीं अनंता पालखेडे श्रीं दिनेश आडे श्री तुळशीराम चव्हाण श्रीं अमित साताळेकर श्री हर्षल हाडोळे श्री निवृत्ती बायस्कार श्री विश्वास लांडे श्रीं शिवराज येऊलकर श्रीं प्रफुल नवले श्री फारुक श्री साजीद अली श्रीं उमेश ज्योत श्रीं किरण पवार व कर्मचारी उपस्थित होते .