किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : जागतिक दिनानिमित्त मुंबई येथील मेदार (मुरूड) समाजातील महिलांचा जे की बांबू पासून आपल्या कलेतून वेगवेगळ्या सुंदर कलाकृती करणा-या कष्टकरी महिलांचा करणी सेना महाराष्ट्र प्रदेश, पिंपरी चिंचवड राजपूत समाज संगठन पुणे तसेच पातुर तालुका विकास मंचच्या वतीने पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. आधुनिक भारतातील महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्व आणी अंगी असलेल्या महत्वकांक्षी कौशल्याने आपल्या कामामुळे स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करत आहे. मेदार (मुरूड) हा मागासवर्गीय समाज आहे पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटकातून स्वप्न नगरी असलेल्या मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे.आपल्या कलेतून बांबूपासून अनेक प्रकारच्या नाविण्यपूर्ण बनविण्यात यांचा हातखंडा आहे.या समाजाच्या गरजेच्या अनेक मागण्या आहेत त्या पुर्ण करून देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे.शासनाने त्यांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी राजपूत संगठना सदैव प्रयत्नशील आहे असे मत त्यांचा सन्मान करते वेळी ठाकूर शिवकुमारसिंह बायस व करणी सेना प्रवक्ता दिनेश जाधव महासचिव राणा अशोक सिंह इंगळे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन पातुर तालुका विकास मंचच्या वतीने तसेच मेदार (मुरूड) समाज यांच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमिला मेदार,कलावती मेदार, कमला मेदार,अन्नक्का मेदार,लक्ष्मी मेदार, अन्नपुर्णा नाईक,शोभा मेदार,पलात्रा गौडा,चैत्रा गौडा,बसम्मा नाईक,तायक्का मेदार, शंकरम्मा गौडा,रूपा बिरूड,बिमाक्का बिरूड, लक्ष्मी रतन, कंचम्मा मेदार,गंगाम्मा मेदार,मिरा नाईक, सुरेश नाईक, गोविंद नाईक, ज्ञानेश्वर सुरडकर व इतर समाज बांधव उपस्थित होते.


