अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मेडशी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्राम पंचायत प्रशासन,
पोलिस माझा आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने नारीशक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला.मेडशी येथे जागतिक महिला दिनी आयोजित नारीशक्ती सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ग्राम पंचायत कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीताई प्रदीप तायडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून गटविकास अधिकारी विलास खिल्लारे,बाल व महिला संरक्षण अधिकारी आलोक अग्रहरी यांची उपस्थिती होती.तर माजी सभापती शेख गणीभाई हाजी शेख चाँदभाई कौशल्याबई साठे पंचायत समिती सदस्य,सरपंच शेख जमीरभाई शेख गणीभाई,उपसरपंच सोनाली धीरज मंत्री,वनपाल लक्ष्मी शहा,अनिताताई चोथमल पोलिस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे,प्रियाताई पाठक, प्रदीप तायडे माजी पंचायत समिती सदस्य आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.याप्रसंगी हलाखीचे जीवन जगणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या मातांनी पाल्याना शिक्षण दिले.त्यांचे पाल्य विविध क्षेत्रात शासकीय सेवेत आहेत. तर काही पाल्य चक्क विदेशात नोकरीवर आहेत.आपल्या पाल्यांचे जीवन घडविणाऱ्या २२ त्यागमूर्ती मातांसह प्रसार माध्यम प्रतिनिधीच्या मातांचाही यावेळी नारीशक्ती सन्मान पुरस्कार,स्मृतिचिन्ह शाल,पुष्पगुच्छ,महापुरुषाच्या जीवनावरआधारित पुस्तके , सम्राट टाइम्स विशेषांक आणि भेटवस्तू देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य मुलचंद चव्हाण,अमोल तायडे,गजानन झाटे,कैलास ढाले,संध्याताई भगवानराव मेडशीकर, शांताबाई प्रकाश तायडे,मीराताई ज्ञानेश्वर मुंढे,पुजाताई जगदीश राठोड,आदीसह मनीष घुगे, शौकत पठाण ,नानाभाऊ तायडे,धर्मराज चव्हाण,रागला राठोड,संतोष साठे,ज्ञानेश्वर मुंढे, अजय चोथमल, प्रसाद पाठक,विठ्ठल भागवत,सोहेल पठाण,बाळु साठे,सुधाकर चोथमल,संजय भागवत,सचिन साठे,सलीन भाई,युसुफ पठाण, अजिंक्य मेडशिकर,अजय वाकोडे,ग्राम पंचायत कर्मचारी शेख जावेद ,बाळू घुगे मुकेश चव्हाण, ,राजकुमार राठोड,दत्ता काळे,अंगणवाडी कर्मचारी,बचत गटांच्या महिलांची मोठ्या प्रमाणत उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद तायडे यांनी केले.सूत्रसंचालन शेख जावेद यांनी तर आभार मीराताई मुढे यांनी केले.