विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला: पातुर नंदापूर येथे तारेवरची कसरत करणारे (खामकोलाटी) गावामध्ये आपली कसरत दाखवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. गावात दिवसभर मुली आणि स्त्रिया आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षा मागत असतात. महिला जागतिक दिना निमित्त कर्तबगार महिलांचा सन्मान होत असतो.
परंतु दिवसभर तारेवरची कसरत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांचा सन्मान. राष्ट्रवादी महिला अध्यक्ष
सौ. दीपमाला मिलिंद खाडे यांनी
तारेवरच्या कसरती करणाऱ्या महिलांचा ब्लाउज पीस व बिस्किट पाकीट देऊन त्यांचा सन्मान केला. जागतिक महिला दिनानिमित्त हा सन्मान मिळाला परंतु त्या महिलांना महिला दिन हा सुद्धा माहीत नसल्यामुळे
आणि आपला सन्मान झाला म्हणून त्यांचं मन भरून आले जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान कार्यक्रमात
राष्ट्रवादी महिला अध्यक्ष दीपमाला खाडे. नसरीन कौसर,
मिलिंद खाडे, राजू आव्हाळे, शेख रहीम, अधिक मान्यवर उपस्थित होते.