प्रगती देशमुख
व्यवस्थापकीय संपादिका
मोर्शी : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील पिंपळखुटा मोठा येथे शिवमंदिरात अचानक भाविकांची मोठी गर्दी जमा झाली. या मंदिरातील नंदी पाणी आणि दूध पीत असल्याची चर्चा क्षणार्धात गावभर पसरली. त्यानंतर भाविकांनी दूध घेऊन मंदिरात धाव घेतली. विशेष म्हणजे या नंदी महादेवाला पाणी आणि दूध पाजण्यासाठी मंदिरात मोठी रांग लावली आपला नंबर आल्यानंतर ते नंदीला पाणी दूध पाजण्यासाठी पुढे जात होते.
ही संपूर्ण घटना पाहण्यासाठी गावातील लोकांनी तोबा गर्दी केलेली पाहायला मिळाली.